पुणे : गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्थेचे कुलगुरू डॉ. अजित रानडे यांनी सोमवारी त्यांच्या कुलगुरूपदाचा राजीनामा दिला आहे. रानडे यांच्या कुलगुरू पदासाठीच्या पात्र-अपात्रतेचा मुद्दा गाजत होता. त्यावरून न्यायालयीन प्रक्रियाही पूर्ण झाल्यानंतर रानडे यांनी वैयक्तिक कारणास्तव कुलगुरूपदाचा राजीनामा देत असल्याचे पत्र गोखले संस्थेचे कुलपती डॉ. संजीव सन्याल यांना दिले आहे.
तत्कालीन कुलपती डॉ. बिबेक देबराय यांनी सत्यशोधन समितीच्या शिफारसीनुसार, डॉ. रानडे यांची नियुक्ती रद्द करण्याचा निर्णय घेतला. न्यायालयाने डॉ. देबराय यांच्या निर्णयाला स्थगिती देत डॉ. रानडे यांना दिलासा दिला होता. त्यानंतर डॉ. देबराय यांनी कुलपती पदाचा राजीनामा दिला. ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. संजीव सन्याल यांची कुलपतीपदी नियुक्ती झाल्यावर त्यांनी डॉ. रानडे यांच्यावरील कारवाईचे पत्र मागे घेत असल्याचे न्यायालयाला कळवले होते.