हडपसर : उत्साह, जल्लोष आणि आबालवृद्धांच्या साक्षीने आज मुंढवा परिसरात महायुतीचे उमेदवार चेतन विठ्ठल तुपे यांची बाईक रॅली आणि पदयात्रा संपन्न झाली. हडपसरच्या ग्रामदैवतेला वंदन करून काळभैरवनाथ यांचे आशीर्वाद घेऊन प्रचाराचा नारळ वाढविण्यात आला. त्यानंतर बाईक रॅली आणि पदयात्रा काढण्यात आली.
या पदयात्रेत ठिकठिकाणी चेतन तुपे यांना हडपसरच्या जनतेचे विशेषतः आबालवृद्धांपासून सर्वांचे निरपेक्ष प्रेम, कौतुक आणि पाठींबा मिळाला. माझ्या जनतेचा हा अकृत्रिम जिव्हाळा, माया हीच माझी ताकद आहे, यामुळे मी भारावून गेलो आहे, अशी प्रतिक्रिया चेतन तुपे यांनी दिली आहे.
मुंढवा – काळभैरवनाथ मंदिर – गावठाण – कोद्रेनगर – रेल्वे स्टेशन – धायरकरवस्ती- पिंगळे वस्ती – बी.टी कवडे रोड- भीमनगर – जहांगीर नगर- सेंट प्रॅक्टिक टाऊन या भागात बाईक रॅली आणि पदयात्रा संपन्न झाली. या सर्व भागातून तमाम जनतेने उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. ठिकठिकाणी लाडक्या बहिणींनी औक्षण करत चेतन तुपे यांचे स्वागत केले.
यावेळी पुणे महानगर पालिकेचे माजी महापौर भोसले, माजी नगरसेविका सुरेखाताई कवडे, माजी नगरसेविका हिमाली कांबळे, किशोर धायरकर, बाळासाहेब कोद्रे, अजित गायकवाड, जितीन कांबळे, साधना सहकारी बँकेचे माजी चेअरमन चंद्रकांत कवडे, संचालक राजेश कवडे, डॉ. दादा कोद्रे, अनिल लोणकर, पंकज कोद्रे, गौरी पिंगळे, देवेंद्र भाट, नारायण भंडारी, विशाल कवडे, कुलदीप कोद्रे, संजय लोणकर, देविदास लोणकर, विशाल मते आदी उपस्थित होते.