सध्या ‘लिव्ह-इन रिलेशनशिप’मध्ये राहणाऱ्यांची संख्या वाढताना दिसत आहे. यापूर्वी भारतात ही पद्धत नव्हती. मात्र, गेल्या 6-8 वर्षांपासून याचे प्रमाण वाढताना दिसत आहे. यामध्ये पुरुष आणि स्त्री लग्नाशिवाय पती-पत्नीसारखे एकत्र राहतात. ही पद्धत आता वाढत आहे. मात्र, याचे फायदे जरी असले तरी तोटेही आहेत. त्याचीच माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत.
‘लिव्ह-इन रिलेशनशिप’मध्ये राहण्याचे फायदे अनेक आहेत. त्यामध्ये ‘लिव्ह-इन रिलेशनशिप’मध्ये राहून पार्टनर एकमेकांना चांगल्याप्रकारे समजून घेऊ शकतात. एकत्र राहून, जोडीदारांना एकमेकांच्या सवयी आणि जीवनशैलीबद्दल माहिती मिळते, जी भविष्यात एकत्र राहण्यासाठी उपयुक्त ठरू शकते. जर तुम्ही या नात्यात एकत्र आनंदी नसाल तर तुम्ही सहजपणे वेगळे होऊ शकता. हे फायदे जरी असले तरी तोटेही अनेक आहेत.
‘लिव्ह-इन रिलेशनशिप’मध्ये राहण्याचेही तोटे बरेच आहेत. त्यामध्ये तुम्ही लग्नाशिवाय एकत्र राहत असाल तर काही काळानंतर विश्वास अर्थात भरोसासंबंधित समस्या सुरू होतात. अशा रिलेशनशिपमध्ये जास्त सेल्फ लाईफ नसते. थोडेसे मतभेदातही नाते तुटू शकते. बहुतेक जोडपी आई-वडिलांना न सांगता एकत्र राहतात, त्यामुळे मोठ्या प्रमाणात गुन्हे घडू शकतात. यांसह इतर अनेक तोटे आहेत. त्यामुळे याकडेही लक्ष द्यावे.