करमाळा : करमाळा तालुक्यामध्ये बागल गटाला धक्का बसला असून कार्यकर्त्यांनी रामदास झोळ यांच्या गटात प्रवेश केला आहे. येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांना बहुमताने निवडून देण्यासाठी काम करणार असल्याचे मत पारेवाडी येथील बागल गटाचे कार्यकर्ते यांनी व्यक्त केले आहे. पारेवाडी येथील बागल गटाच्या निष्ठावंत कार्यकर्ते निलेश गरुड, सुंदर गरुड, शिवाजी शिंदे, विष्णू जाधव, संभाजी गरुड, राहुल गरुड, तोफिक आतार यांनी करमाळा विधानसभा निवडणुकीसाठी प्राध्यापक रामदास झोळ यांना पाठिंबा देऊन झोळ गटात प्रवेश केला आहे. यावेळी पारेवाडी येथील बागल गटाच्या कार्यकर्त्यांनी प्राध्यापक रामदास झोळ यांना निवडून आणण्यासाठी आपण काम करणार असल्याचे सांगितले आहे.
दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक रामदास झोळ यांच्या पत्नी दत्तकला शिक्षण संस्थेच्या सचिव मायाताई झोळ यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. सध्या करमाळा तालुक्यामध्ये परिवर्तनाची लाट असून अभ्यासू नेतृत्व म्हणून प्राध्यापक रामदास झोळ यांची ओळख आहे. यंदा बदल घडणार असून प्राध्यापक रामदास झोळ यांना जनता नक्कीच निवडून देईल असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे. पारेवाडी ग्रामस्थांच्यावतीने करमाळा तालुक्यातील पारेवाडी गावातुन सर्वाधिक मताधिक्य देणार असल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले आहे. यावेळी रामदास झोळ फाउंडेशनचे संजय जगताप ज्ञानेश्वर शिंदे उपस्थित होते.