दिल्ली : न्यूझिलंड संघ सद्या भारताच्या दौऱ्यावर आहे. न्यूझिलंडविरोधात तीन कसोटी मालिकेमध्ये भारताने न्यूझिलंड विरोधातील कसोटी मालिका गमावली आहे. सध्या मुंबईमध्ये टीम इंडिया आणि न्यूझिलंड यांच्यात तिसरा कसोटी सामना सुरू आहे. यानंतर भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीला सुरुवात होणार आहे. न्यूझिलंडविरोधातील तिसरा कसोटी सामना संपल्यानंतर पाच नोव्हेंबरनंतर टीम इंडिया कधीही बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी ऑस्ट्रेलियाला रवाना होवू शकते. मात्र त्यापूर्वी एक मोठी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे ऑस्ट्रोलिया दौऱ्यामधील टीम इंडियाचा एक सामना रद्द करण्यात आला आहे.
22 नोव्हेंबरपासून पर्थमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणाऱ्या पाच कसोटी सामन्याच्या या कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. मात्र या सामन्यापूर्वी भारतीय टीम इंडिया एच्या विरोधात एक वॉर्म अप मॅच खेळणार होती. हा सामना बीसीसीआयने रद्द केला आहे. इंडिया ए च्या विरोधात 15 ते 17 नोव्हेंबर दरम्यान होणारा वॉर्म अप सामना देखील पर्थच्याच मैदानात होणार आहे. जिथे भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान पहिला कसोटी सामना खेळला जाणार आहे.
या सामन्यासाठी भारतीय संघानं जोरदार तयारी केली आहे. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीपूर्वी टीम इंडियाकडून आपसात खेळण्याचा प्लॅन बनवण्यात आला होता. परंतु टीम इंडियानं न्यूझिलंडविरोधात कसोटी मालिका गमावली आहे, सलग दोन सामन्यांमध्ये भारताचा पराभव झाला आहे. या खराब कामगिरीमुळे बीसीसीआय नाराज असून बॉर्डर गावस्कर ट्रॉफीपूर्वी होणारी वॉर्मअप मॅच रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वॉर्म मॅचऐवजी आता खेळाडू नेट प्रॅक्टिसवर भर देणार आहेत.