मुंबई : राज्यात सध्या दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात, रोषणाई आणि फटाक्याच्या आतषबाजीमध्ये साजरा केला जात आहे. च्या तोंडाऐन दिवाळी सणावर गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याने एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना मुंबईतील उलवे येथील जावळे गावात किराणा दुकानात घडली आहे. मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये आई-वडील आणि दोन मुलांचा समावेश आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, उलवे येथील जावळे गावात एक किराणा मालाचे दुकान आहे. या दुकानात अवैधरित्या पेट्रोल विक्री करण्यात येत होती. तसेच तिथे लहान सिलेंडरची देखील विक्री करण्यात येत होती. दुकानात स्फोटक साहित्य मिळतात. असे असताना सायंकाळी पणती पेटविताना पेट्रोलला आग लागून गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. या सिलेंडरच्या स्फोटाची तीव्रता अतिशय भयानक होती, त्यामुळे तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एकाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
दरम्यान, या सिलेंडरच्या स्फोटाची तीव्रता अतिशय भयानक होती, त्यामुळे तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एकाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. यावेळी तीन ते चार लहान सिलेंडरचा स्फोट झाला. त्यामध्ये चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्या व्यक्तींमध्ये आईसह दोन मुलांचा समावेश आहे.
त्यात ३८ वर्षीय महिला, एक १५ वर्षांची मुलगी असून एक ८ वर्षांचा मुलगा आहे. एकूणच या घटनेमुळे उलवे विभागात अवैधरित्या होणाऱ्या पेट्रोल विक्रीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. या दुर्दैवी घटनेनंतर तरी पोलीस प्रशासनाला जागं येणार कि नाही ? हे पाहणे देखील तेवढेच महत्त्वाचे ठरणार आहे.