बंगळूर : मोटार वाहन उद्योग जगतातील आघाडीचे उद्योजक विक्रम किर्लोस्कर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले असून त्यांनी ६४ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. बंगळुरुमधील हेब्बल स्मशानभूमीत दुपारी १ वाजता त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत. अशी माहिती टोयोटा इंडियाच्या अधिकृत ट्विटर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
टोयोटा इंडिया कंपनीनं प्रसिद्ध केलेल्या ट्विटवर “टोयोटा किर्लोस्कर मोटरचे उपाध्यक्ष विक्रम किर्लोस्कर यांचे 29 नोव्हेंबर 2022 रोजी अकाली निधन झालं. या वृत्तानं आम्ही खूप दुःखी आहोत. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो.
आमची सहानुभूती त्यांच्या कुटुंबीयांसह आणि मित्रांसोबत आहे. त्यांच्या पार्थिवावर 30 नोव्हेंबर 2022 रोजी दुपारी 1 वाजता हेब्बल स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. असे म्हटले आहे.