दौंड, (पुणे) : दौंड पोलीस ठाण्याच्या हद्दीत दरोडा, घरफोड्या करून मागील 1 वर्षापासून फरार असलेल्या आरोपीला दौंड पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने गिरिम (ता. दौंड) येथून ताब्यात घेतले आहे.
मिथुन प्रकाश राठोड (रा. राघोबानगर गिरीम ता. दौंड) असे ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून त्याच्यावर भिवंडी पोलीस ठाण्यात 12 गुन्हे दाखल आहेत. तर दौंड पोलीस ठाण्यात विविध 5 गुन्हे दाखल आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आशिष रमेश प्रजापती (रा. कुरकुंभ ता. दौड) यांच्या घरी 6 जानेवारी 2024 रोजी अज्ञात पाच इसमांनी घरात घुसून प्रजापती यांना जिवे मारण्याची धमकी देवुन जबरी चोरी करून फिर्यादीचे मोबाईल व रोख रक्कम 46 हजार असा माल दरोडा टाकुन घेवुन गेले होते.
गुन्हा घडल्यापासून आरोपी मिथुन राठोड हा फरार होता. तसेच इतर 2 घरफोडी मध्येही तो गुन्हा घडल्यापासून फरार होता. सदरचा आरोपी हा मंगळवारी (ता. 29) गिरीम येथे येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार दौंड पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने आरोपीस अटक केली. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता आरोपीने भिवंडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत 12 गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. त्याच्यावर भिवंडी पोलीस स्टेशन हद्दीत एकूण 12 गुन्हे दाखल असुन दौड पोलीस स्टेशन हद्दीत एकुण 5 गुन्हे दाखल आहेत.
सदरची कामगिरी दौंडचे पोलीस निरीक्षक गोपाळ पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक तुकाराम राठोड, नागनाथ पाटील, पोलीस उपनिरीक्षक उगले, पोलीस हवालदार सुभाष राउत, नितीन बोराडे, विठठल गायकवाड, अमिर शेख, निखील जाधव, नितीन दोडमिसे, पवन माने, जागताप यांनी केली.