अयोध्या: अयोध्येत रामलल्ला विराजमान झाल्यानंतर पहिली दिवाळी साजरी होत आहे. अयोध्येत 500 वर्षानंतर अशी दिवाळी साजरी होत आहे. अयोध्येत बुधवारी दोन विश्वविक्रम करण्यात आले. मंदिरात 25 लाख पणत्या प्रज्वलित करण्याचा तसेच सर्वाधिक म्हणजे 1121 जणांनी एकाच वेळी आरती करण्याचा विश्वविक्रम प्रस्थापित केला आहे.
प्रभू श्रीरामांच्या अयोध्या नगरीमध्ये रामजन्मभूमीच्या ठिकाणी भव्य मंदिरात रामललाची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतरची ही पहिलीच दिवाळी आहे. त्यामुळे या दिवाळीला अतिशय महत्त्व आहे. अयोध्येमध्ये दिवाळीची वेगळीच भव्यता आणि मांगल्य जाणवत आहे.
ही दिवाळी अनुभवण्यासाठी, दिवाळीमध्ये रामललाचं दर्शन घेण्यासाठी जगभरातून भाविक अयोध्येत दाखल झाले आहेत. यासह शरयू घाटावरही लेझर आणि लाईट शो सुरू असून तो प्रेक्षकांना भुरळ घालत आहे. त्याचा व्हिडिओही समोर आला आहे.
हा अयोध्येतील आठवा दिपोत्सव आहे. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते या दीपोत्सवाची आरती करण्यात आली. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये याची नोंद केली जाणार आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पहिला दिवा लावून दीपोत्सव कार्यक्रमाची सुरुवात केली.
#WATCH | Uttar Pradesh: Lakhs of diyas illuminated along the banks of the Saryu River in Ayodhya as part of the grand #Deepotsav celebration here.#Diwali2024 pic.twitter.com/7yd1QxDVZY
— ANI (@ANI) October 30, 2024