पुणे : पुण्यात आज बुधवारी (दि.30) सर्वत्र धुक्याची चादर पसरलेली पाहायला मिळाली. आज पहाटेपासूनच पुणे शहरासह उपनगरात मोठे धुके पडले. दिवाळी सुट्टी असल्यामुळे रस्त्यावर जरी वाहतूक कमी असली तरी वाहनचालक धुक्याचा आनंद घेत त्यांची वाहने हळू चालवत होती. त्यामुळे पहाटे घराबाहेर पडलेल्या पुणेकरांनी धुक्याचा आनंद घेतला.
गेल्या काही दिवसांपासून वातवरणात सतत बदल होत आहे. काही भागात पाऊस, ढगाळ हवामान तर कधी थंडी असे संमिश्र वातावरण तयार झाले आहे. गुलाबी थंडी, दाट धुके आणि दवबिंदु असे मनमोहक वातावरण पुण्यात नागरिकांना सकाळी अनुभवायला मिळाले.
पुणे शहराच्या आसपास अनेक टेक़ड्या आहेत. या टेकड्यांवर मॉर्निंगसाठी जाणा-यांची संख्याही मोठी आहे. त्यामुळे सकाळी मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या पुणेकरांना आज हे धुके पाहायला मिळाले. त्यामुळे पहाटे घराबाहेर पडलेल्या पुणेकरांनी धुक्याचा मनमुराद आनंद लुटला आहे.