लातूर : विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर लातूरमध्ये भाजपाला मोठे खिंडार पडले आहे. लोकसभेच्या पराभवानंतर भाजपमधून नॉट रिचलेबल झालेले माजी खासदार सुधाकर शृंगारे यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत आज काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. शृंगारे यांच काँग्रेसमध्ये जाणं हा भाजपला मोठा धक्का मानला जात आहे.
माजी मंत्री तथा लातूर शहराचे आमदार अमित देशमुख आणि धीरज देशमुख यांच्या प्रचार शुभारंभ सभेवेळी भाजपला सोडचिट्टी देत आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह शृंगारे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यामुळे ऐन विधानसभेच्या तोंडावरच लातूर जिल्ह्यात भाजपाला मोठ खिंडार पडले आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत सुधाकर शृंगारे यांनी विजय मिळवला होता. यानंतर मुद्दा झालेल्या लोकसभा निवडणुकीत देखील भाजपकडून त्यांना संधी देण्यात आली होती. मात्र सुधाकर शृंगारे यांचा काँग्रेसचे डॉ. शिवाजी काळे यांनी पराभव केला होता.
लोकसभा निकालानंतर भाजपमधून नॉटरीचेबल झालेले उदगीर राखीव विधानसभा मतदारसंघातून भाजपकडून इच्छुक होते. मात्र त्या ठिकाणची जागा महायुतीत राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे गेल्याने आज सुधाकर शृंगारे यांनी थेट भाजपला सोड चिठ्ठी देत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यामुळे ऐन विधानसभेच्या तोंडावर भाजपाला लातूर जिल्ह्यात मोठे खिंडार पडले आहे.