पुणे : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने २० उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये पुण्यातील पुरंदर विधानसभा मतदारसंघातून विजय शिवतारे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
दरम्यान, विधानसभेच्या निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही आघाड्यांमधील पक्षांनी आपल्या उमेदवार याद्या जाहीर केल्या आहेत. भाजपने आत्तापर्यंत 121 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. तर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने आतापर्यंत 65 उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत.
पहा संपूर्ण यादी
- अक्कलकुवा – आमश्या पाडवी
- बाळापूर- बळीराम शिरसकर
- रिसोड – भावना गवळी
- हदगाव- बाबुराव कदम कोहळीकर
- नांदेड दक्षिण- आनंद तिडके पाटील (बोंडारकर)6. परभणी- आनंद शेशराव भरोसे
- पालघर – राजेंद्र घेड्या गावित
- बोईसर (अज) – विलास सुकुर तरे
- भिवंडी ग्रामिण (अज) – शांताराम तुकाराम मोरे
- भिवंडी पूर्व – संतोष मंजय्या शेट्टी
- कल्याण पश्चिम – विश्वनाथ आत्माराम भोईर
- अंबरनाथ (अजा) – डॉ बालाजी प्रल्हाद किणीकर
- विक्रोळी – सुवर्णा सहदेव करंजे
- दिंडोशी – संजय ब्रिजकिशोरलाल निरुपम
- अंधेरी पूर्व – मुरजी कांनजी पटेल
- चेंबूर – तुकाराम रामकृष्ण काते
- वरळी – मिलींद मुरली देवरा
- पुरंदर – विजय सोपानराव शिवतारे
- कुडाळ – निलेश नारायण राणे
- कोल्हापुर उत्तर – राजेश विनायक क्षिरसागर