पुणे : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची २२ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये पर्वती मतदार संघातून अश्विनी कदम यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर खडकवासला मतदारसंघातून सचिन दोडके, तसेच जुन्नर मतदार संघातून सत्यशील शेरकर बीडमधून संदीप क्षीरसागर, येवल्यामधून माणिकराव काळे, माळशिरसमधून उत्तम जानकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेत पक्षाची दुसरी यादी जाहीर केली आहे.
दरम्यान, काँग्रेसकडून पर्वती मतदारसंघातून आबा बागुल यांनी दावा सांगितला होता. मात्र, ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने आपल्याकडेच ठेवली आहे. तसेच धाराशिव जिल्ह्यातील परांडा विधानसभा मतदारसंघात शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाने आपला उमेदवार जाहीर केला होता. मात्र, राष्ट्रवादीने आज परांडा येथे डॉ. तानाजी सावंत यांच्या विरोधात माजी आमदार राहुल मोटे यांचे नाव जाहीर केले आहे. त्यामुळे या मतदारसंघात आता मविआमध्ये वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
पहा संपूर्ण यादी
- एरंडोल – सतीश अण्णा पाटील
- गंगापूर – सतीश चव्हाण
- शहापूर – पांडुरंग बरोरा
- भूम-परांडा – राहुल मोटे
- बीड – संदीप क्षीरसागर
- आर्वी – मयुरा काळे
- बागलान – दीपिका चव्हाण
- येवला – माणिकराव शिंदे
- सिन्नर – उदय सांगळे
- दिंडोरी – सुनीताताई चारोसकर
- नाशिक पूर्व – गणेश गिते
- उल्हासनगर – ओमी कलानी
- जुन्नर – सत्यशील शेरकर
- पिंपरी – सुलक्षणा शिलवंत
- खडकवासला – सचिन दोडके
- पर्वती – अश्विनीताई कदम
- अकोले – अमित भांगरे
- अहिल्यानगर शहर – अभिषेक कळमकर
- माळशिरस – उत्तम जानकर
- फलटण – दीपक चव्हाण
- चंदगड – नंदिनीताई कुपेकर
- इचलकरंजी – मदन कारंडे