मुंबई : उद्धव ठाकरेंच्या शिवसेना पक्षाकडून दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये कणकवलीमधून संदेश भास्कर पारकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तसेच शिवसेना गटनेते अजय चौधरी यांना शिवडी मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली असून धुळ्यातून अनिल गोटे, तर बुलढाण्यात जयश्री शेळके यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
शिवसेना ठाकरे गटाच्या दुसऱ्या यादीत १५ उमेदवारांचा समावेश आहे. ठाकरेंनी पहिल्या यादीत ६५ उमेदवारांची घोषणा केली होती. आतापर्यंत ठाकरेंनी ७० नावांची घोषणा केली आहे. मविआच्या जागावाटपात ठाकरेंना ९० जागा मिळाल्या असून त्यामधील ७० जागांवर त्यांनी आतापर्यंत उमेदवार जाहीर केले आहे. उर्वरित २० जागांवरील उमेदवारांची लवकरच घोषणा होण्याची शक्यता आहे. आज ठाकरेंनी १५ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.
दुसऱ्या यादीतील १५ उमेदवार पुढीलप्रमाणे..
- धुळे शहर- अनिल गोटे
- चोपडा (अज)- राजू तडवी
- जळगाव शहर- जयश्री सुनील महाजन
- बुलढाणा- जयश्री शेळके
- दिग्रस- पवन श्यामलाल जयस्वाल
- हिंगोली- रूपाली राजेश पाटील
- देवळाली (अजा) – योगेश घोलप
- परतूर- आसाराम बोराडे
- कल्याण पश्चिम- सचिन बासरे
- कल्याण पूर्व – धनंजय बोडारे
- वडाळा- श्रद्धा श्रीधर जाधव
- शिवडी- अजय चौधरी
- भायखळा- मनोज जामसुतकर
- श्रीगोंदा- अनुराधा राजेंद्र नागावडे
- कणकवली- संदेश भास्कर पारकर