-राहुलकुमार अवचट
यवत : मानकोबावाडी शाळेच्या मुख्याध्यापिका स्वाती माने यांना राज्यस्तरीय गौरव पुरस्कार देऊन नुकतेच सन्मानित करण्यात आले. हा सन्मान सोहळा थेरगाव येथील खिवंसारा पाटील शैक्षणिक संकुल या ठिकाणी नुकताच पार पडला.
यावेळी विद्यानिकेतन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष शशिकांत कोचळे, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अशोक नगरकर, सिनेअभिनेता संतोष नलावडे, सिनेअभिनेत्री प्रियांका शिंदे, मुख्याध्यापक जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी माणकोबावाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका स्वाती वसंत माने यांच्या शैक्षणिक कार्याची राज्यस्तरावर दखल घेत त्यांना राज्यस्तरीय महाराष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
मुख्याध्यापिका स्वाती माने यांनी शाळेत अनेक नवनवीन उपक्रम राबविले आहेत. त्यामुळे मागील वर्षी शाळेला मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा स्पर्धेत दौंड तालुक्यात दुसरा क्रमांक मिळाला होता. त्याच बरोबर हस्ताक्षर स्पर्धा, पाढे पाठांतर, स्पेलिंग पाठांतर, अवांतर वाचन, सीड बॉल निर्मिती, वृक्षारोपण, पालखी सोहळा, दहीहंडी, महाभोंडला, रांगोळी स्पर्धा, मेहंदी स्पर्धा, परसबाग, गांडूळखत प्रकल्प असे विविध उपक्रम शाळेत राबविले जात असून यांची दखल घेऊन विद्यानिकेतन सामाजिक संस्था या संस्थेने स्वाती माने यांना महाराष्ट्र गौरव पुरस्कार 2024 या पुरस्काराने सन्मानित केले आहे. यवत परिसरातील मानकोबावाडी शाळेच्या मुख्याध्यापिका स्वाती माने यांना राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाल्याने यवत व मानकोबा वाडी परिसरातील नागरिकांकडून कौतुक होत आहे.