सध्या मधुमेह असो वा रक्तदाब ही समस्या फक्त ज्येष्ठांना नाहीतर तरूणांमध्येही जाणवते. गेल्या काही वर्षांची आकडेवारी पाहिली तर सणासुदीच्या काळात बहुतेक मधुमेही रुग्णांच्या रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्याचे दिसून येते. खाण्यापिण्याच्या सवयींबाबतचा निष्काळजीपणा हे त्याचे प्रमुख कारण असू शकते.
ज्यांना रक्तातील साखरेची जास्त समस्या आहे किंवा जे इन्सुलिन घेत आहेत त्यांनी अशा प्रकारच्या गोष्टी खाणे टाळावे ज्यामुळे साखरेची पातळी वाढू शकते. मिठाई, कार्बोहायड्रेट किंवा साखरेसोबत असलेल्या गोष्टी तुमच्या गुंतागुंत वाढवू शकतात. सणाच्या काळात रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी सकस आणि पौष्टिक आहार घेणे, शारीरिकदृष्ट्या सक्रिय राहणे आणि रक्तातील साखरेची नियमित तपासणी करणे महत्त्वाचे आहे.
साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी मधुमेहींनी मिठाई टाळावी. ज्या लोकांची साखरेची पातळी अनेकदा जास्त असते त्यांना अधिक सावध राहण्याचा सल्ला दिला जातो. साखरेऐवजी गूळ आणि ड्रायफ्रुट्सपासून बनवलेल्या मिठाईचे सेवन माफक प्रमाणात करता येते. आहारात फायबरयुक्त पदार्थांचे प्रमाण वाढवा, जेणेकरून मिठाई खाल्ल्याने होणारे दुष्परिणाम कमी करता येतील. याशिवाय दिवसभरात भरपूर पाणी पिणे गरजेचे आहे, यामुळे साखरेवर नियंत्रण ठेवणे सोपे जाते. रिफाइंड पिठाच्या ऐवजी संपूर्ण धान्य पिठाने तयार केलेले पदार्थ खावेत.