पुणे : पुणे-मिरज दुहेरीकरण २८० किमीचा रेल्वे प्रकल्प पूर्णत्वाच्या जवळ आहे. आत्तापर्यंत २३० किमीचे काम करण्यात आले आहे. शिरवाडे- कराड- शेणोली दरम्यानचा २२ किमी ट्रक बुधवार (दि. २३) रोजी कार्यान्वित करण्यात आला. रेल्वे सेफ्टी, सेंट्रल सर्कलचे आयुक्त मनोज अरोरा यांनी शेणोली ते शिरवाडे मोटार ट्रॉलीची तपासणी सकाळी ९ वाजल्यापासून सुरू केली आहे. शिरवाडे ते शेणोली या मार्गावर ताशी १३० किमी वेगाने स्पीड ट्रायल करण्यात आली. मध्य रेल्वेचे मुख्य प्रशासकीय अधिकारी (बांधकाम) अवनीश पांडे, पुणे रेल्वे विभागीय व्यवस्थापक इंदू दुबे आणि मध्य रेल्वेच्या बांधकाम संस्थेचे, तसेच पुणे विभागाचे अधिकारी या वेळी सोबत होते.