नवी दिल्ली : सध्या युट्यूबचा वापर वाढला आहे. YouTube ला त्याच्या प्लॅटफॉर्मवर अधिकाधिक युजर्स जोडायचे आहेत. अशा परिस्थितीत यूट्यूब प्रीमियम लाइट सबस्क्रिप्शन प्लॅन लाँच करण्याच्या तयारीत आहे. या प्लॅनची किंमत YouTube Premium प्लॅनच्या तुलनेत निम्मी असू शकते. यूट्यूबद्वारे या योजनेची चाचणी केली जात आहे. रिपोर्टनुसार, YouTube Premium Lite प्लॅन भारतात जवळपास 75 रुपयांमध्ये उपलब्ध करून दिला जाऊ शकतो.
YouTube Premium Lite प्लॅन भारतात लाँच केला जाईल की नाही याबद्दल सध्या कोणतीही अधिकृत माहिती दिली गेली नाही. मात्र, सध्या जर्मनी, थायलंड आणि ऑस्ट्रेलिया सारख्या निवडक देशांमध्ये YouTube Premium योजना उपलब्ध आहे. या प्लॅनमध्ये यूट्यूब म्युझिक, बॅकग्राउंड प्ले आणि ऑफलाइन डाउनलोड करण्याची सुविधा उपलब्ध आहे. तसेच यूजर्स प्रीमियम फीचर्स ऍक्सेस करू शकतात. त्यात Ad-Free सेवा उपलब्ध असेल. ज्या युजर्संना जाहिराती बघायच्या नाहीत त्यांच्यासाठी ही योजना उत्तम ठरू शकते.
YouTube Premium Lite प्लॅनमध्ये YouTube Premium पेक्षा कमी फीचर्स असतील. Ad-Free सेवा पूर्वीप्रमाणेच दिली जाणार असली तरी, ज्या फीचर्समध्ये कपात केली जाणार आहे. त्यामध्ये गाणी आणि शॉर्ट व्हिडिओंमध्ये दिसणाऱ्या जाहिरातींचा समावेश असणार आहे. युजर्स YouTube Music वर Ad-Free स्ट्रीमिंगचा आनंद घेऊ शकणार नाहीत.