मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने सोमवारी १८ उमेदवारांना एबी फॉर्म दिल्यानंतर मंगळवार, २२ ऑक्टोबर रोजी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडूनही आपल्या उमेदवारांना एबी फॉर्मचे वाटप करण्यात आले. घाटकोपर (पूर्व) मतदारसंघासाठी राखी जाधव, चिपळूणसाठी प्रशांत यादव, तर पारनेर मतदारसंघासाठी खासदार निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके यांना पक्षाने एबी फॉर्म दिला आहे. २२ ऑक्टोबरपासून प्रत्यक्ष अर्ज भरण्यास सुरुवात झाली, तरी अद्याप महायुती आणि महाविकास आघाडीतील जागावाटप निश्चित झालेले नाही.