पुणे प्राईम न्यूज : सध्या दिवाळीनिमित्त सगळीकडे धामधूम पाहायला मिळते आहे. प्रकाशाचा उत्सव असलेल्या दीपावलीच्या सणाचे अवघ्या काही दिवसांनी आगमन होणार आहे. त्यात कपडे खरेदीची तयारी जोरात सुरु आहे. अशावेळी बाजारात जुनी फॅशन पुन्हा ट्रेंडमध्ये येत असलेली दिसून येत आहे.
अशा सणासुदीच्या दिवसांसाठी खास तयार व्हायचं म्हणजे काही पांरपरिक, एथनिक लुक करणं प्रत्येकालाच आवडतं. चला तर मग सणासुदीला हटके लूक हवा असेल तर तुम्ही अशा पद्धतीचे आऊटफिट वापरुन मॉडर्न दिसू शकता.
-शिवून घेतलेली नऊवारी साडी अंगावर चापून चोपून बसते. हल्ली सगळीकडे ब्राम्हणी नऊवारी साडीचा ट्रेंड आला आहे. ही तुम्ही नेसवून किंवा शिवून सुद्धा घेऊ शकता.
-सणासुदीच्या दिवसात सुंदर दिसण्यासाठी तुमच्या त्वचेशी जुळणारे फॅब्रिक निवडणे महत्त्वाचे आहे. असे फॅब्रिक निवडण्याचा प्रयत्न करा जे तुम्हाला परिधान करण्यास आरामदायक वाटेल.
-साडी नेसणं आणि ती सावरणं जर तुम्हाला नको वाटत असेल तर खणाचा पंजाबी ड्रेस हा एक उत्तम पर्याय आहे. या पंजाबी ड्रेसवरील ओढण्या इतक्या मोठ्या आणि आकर्षक असतात की तुम्ही तुमची खणाची साडी नेसण्याची हौस यात भागवू शकता.
-आजकाल मिक्स अँड मॅच करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे मॅचिंगच्या त्रासात पडण्याऐवजी तुम्ही मिक्स अँड मॅचही करू शकता. असे केल्याने तुमचा लुक आणखी चांगला दिसेल. प्लेन सूटसोबत जड दुपट्टा कॅरी करू शकता.