–अक्षय टेमगिरे
रांजणगाव गणपती : कंबोडिया येथे झालेल्या एशियन सिनीअर किक बॉक्सिंग स्पर्धेमध्ये पुण्यातील घोरपडे पेठमधील चॅम्पियन किक बॉक्सिंग ॲकॅडमीचा देवेन कवी रेणुसे यांने 74 वजन गटामध्ये रौप्यपदक पटकावत देशपातळीवर महाराष्ट्रातील पुण्याची ओळख निर्माण केली. या स्पर्धेमध्ये 24 देशांच्या 618 खेळांडूनी सहभाग घेतला होता.
भारतीय खेळाडूंनी प्रयत्नाची पराकाष्ठा करून 6 सुवर्ण, 17 रौप्य, 16 कांस्यपदक मिळवून सांधिक पाचवा क्रमांक मिळवला. राज्यातील विविध जिल्ह्यातून खेळलेल्या खेळाडूमध्ये साईली कंहत हीने 50 वजनगटात लाईट कॉन्टॅक्ट गोल्ड पदक, किक लाईट प्रकारात सिल्व्हर पदक, शंतणु सागर 91 वजनगटात सिल्व्हर पदक, कार्तिक राठोड 94 वजन गटात सिल्व्हर पदक, आमन पवार हार्ड स्टाईल वेपन प्रकारात सिल्व्हर पदक, ऋतिक बंडेवार 75 वजन गटात सिल्व्हर पदक, दिया प्रकाश गावले 60 वजन गटात ब्राझ पदक प्राप्त करून देशाचे नाव उंचावले.
वाको इंडिया किकबॉक्सिंग फेडरेशनचे अध्यक्ष संतोष अग्रवाल आणि किक बॉक्सिंग असोसिएशन महाराष्ट्राचे अध्यक्ष निलेश शेलार म्हणाले की, किक बॉक्सिंग खेळाचा प्रचार पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रात घडवून भारताचे नाव देशपातळीवर पोहचवण्यासाठी राज्यातील पंच कोचेसचे संघटन करणार आहोत. उत्कृष्ठ खेळाडू निर्माण करत किकबॉक्सिंग खेळाचा प्रचार प्रसार करुयात. तसेच महाराष्ट्र राज्य अग्रेसर बनवून त्यासाठी अहोरात्र प्रयत्न करणार आहोत.
रुपेश परदेशी यांनी देवेण रेणूसे यास प्रशिक्षण तसेच मार्गदर्शन केले. देवेण रेणूसेचा दुर्गामाता नवरात्र उत्सव मंडळ कर्वेनगर, विजय पारगे मित्र परिवाराकडून सन्मान करण्यात आला.