पुणे : ऐन सणासुदीच्या दिवसात राज्यातील रेशन दुकानदारांनी 1 नोव्हेंबरपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. रेशन दुकानदारांच्या विविध मागण्यांबाबत प्रशासन गंभीर नसल्याने रेशन दुकानदार बेमुदत संपावर राहणार आहे. या कारणामुळे आता सणासुदीच्या दिवसात गोरगरीबांचे हाल होतील असे दिसून येत आहे.
दरवर्षी महागाईच्या निर्देशांकानुसार दुकानदारांना मिळणा-या नफ्यामध्ये राज्यसरकारने वाढ केलेली नाही. तसेच धान्यवितरणामध्ये येणा-या अडीअडचणी आणि समस्या सोडविण्यासाठी कोणतीही कार्यवाही झालेली नाही. त्याबाबत धोरणात्मक निर्णय घेतला जात नाही.
रेशन दुकानदारांच्या ‘या’ आहेत प्रमुख मागण्या..
-मिळणाऱ्या मार्जीनमध्ये प्रतिक्विंटल 300 रुपयांची नफ्यात वाढ करावी.
-ई केवायसी (E-KYC) साठी प्रति सदस्य 50 रुपये मिळावे.
-व्यावसायिक दराने वीजपुरवठा न करता तो घरगुती दराने द्यावा
-मालमत्ताकरामध्ये सवलत मिळवी
-आनंदाचा शिधा या संचाच्या विक्रीसाठी पंधरा रुपयांचा नफा देण्यात यावा