इस्लामाबाद : भारतात अनेक मंदिर आहेत. त्यात शेजारील देश पाकिस्तानात हिंदू देवतांची काही मंदिरे आहेत. पाकिस्तानात पंजाबमधील रावी नदीच्या पश्चिमेकडील नारोवाल शहरातील जफरवाल नगरमध्ये बाओली साहिब मंदिराचे बांधकाम सुरु केले आहे. 1960 मध्ये हे मंदिर जीर्ण झाले होते.
सध्या नारोवाल जिल्ह्यात एकही हिंदू मंदिर नाही, ज्यामुळे हिंदू समुदायाला घरी धार्मिक विधी करावे लागतात किंवा त्यासाठी सियालकोट आणि लाहोरमधील मंदिरांमध्ये जावे लागते. बाओली साहिब मंदिराची चौकशी ईटीपीबी करणार आहे. सध्या हे मंदिर मोडकळीस आले आहे. नारोवालमधील 1453 हून अधिक हिंदू त्यांच्या प्रार्थनास्थळापासून वंचित राहिले होते. पाकिस्तानच्या निर्मितीनंतर नारोवाल जिल्ह्यात 45 मंदिरे होती, परंतु ती सर्व दुरुस्तीअभावी मोडकळीस आली.
पाकिस्तानमध्ये हिंदू हा सर्वात मोठा अल्पसंख्याक समुदाय आहे. अधिकृत अंदाजानुसार, पाकिस्तानमध्ये 75 लाखांहून अधिक हिंदू राहतात. आता हिंदू समाजासाठी या मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम केले जाणार आहे. यासाठी दहा लाखांचा खर्च अपेक्षित असल्याचेही सांगण्यात आले आहे. त्यानुसार, आता तयारी केली जात आहे.