नवी दिल्ली: केरळमधील वायनाड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी त्यांच्यासमवेत पक्षाच्या संसदीय दलाच्या प्रमुख सोनिया गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींसह अनेक प्रमुख नेते उपस्थित राहतील. उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी व प्रियंका गांधी रोड शोमध्ये सहभागी होत शक्तिप्रदर्शन करणार असल्याचेही पक्षाच्या सूत्रांनी सांगितले.
लोकसभेत दोन जागांवर निवडून आलेल्या राहुल गांधींनी उत्तर प्रदेशच्या रायबरेलीतील खासदारकी कायम ठेवत वायनाडमधील जागा सोडण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे रिक्त झालेल्या या जागेवर १३ नोव्हेंबर रोजी पोटनिवडणूक होत असून २३ नोव्हेंबरला निकाल लागेल.