पुणे : ‘कुबूल है’ फेम झोया म्हणजे सुरभी ज्योती लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. सुरभी हिच्या होणाऱ्या पतीचं नाव सुमीत सुरी आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सुरभी आणि सुमित यांच्या लग्नाची चर्चा रंगली आहे. सोशल मीडियावर देखील दोघांचे फोटो तुफान व्हायरल होत आहेत.
सुरभी आणि सुमित येत्या 27 ऑक्टोबरला लग्न करणार आहेत. यांच्या लग्नाला फक्त त्यांचे कुटुंबीय आणि जवळचे मित्र उपस्थित राहणार आहेत. हे डेस्टिनेशन वेडिंग असेल, ज्यासाठी या दोघांनी खास जागा निवडली आहे. सुरभी उत्तराखंडमध्ये तिच्या बॉयफ्रेंडशी लग्न करणार आहे. दोघांनी जिम कॉर्बेट नॅशनल पार्कमध्ये लग्नासाठी रिसॉर्ट बुक केले आहे.
सुरभी हिचा होणारा पती सुमित याच्याबद्दल सांगायचं झालं तर, सुमीत उद्योजक आहे. शिवाय सुमीत अभिनेता आणि निर्माता देखील आहे. यांच्या लग्नाची खासियत म्हणजे लग्नातील सगळे विधी पर्यावरणपूरक पद्धतीने पार पाडणार आहेत निसर्गाला हानी पोहोचवणा-या कोणत्याही प्रकारच्या वस्तू या लग्नात वापरल्या जाणार नाहीत. पर्यावरणाची काळजी घेऊन लग्नातील सगळ्या विधीचं आयोजन केलं जाणार आहे.
दरम्यान, ‘कबूल है’, ‘तनहाइयां’, ‘लौट के कोई आया है’, ‘इश्कबाज’, ‘प्यार तूने क्या किया’, ‘ये जादू है जिन का’, ‘देव’, ‘लव्ह लूक व्हाट यू मेड मी डू’ या मालिकांसाठी सुरभी ओळखली जाते. तिने ‘नागिन’ मालिकेतही काम केलं आहे. सुरभी फक्त तिच्या मालिकांमुळेच नाही तर, सौंदर्य आणि फॅशन सेन्समुळे देखील चर्चेत असते.