दिल्ली : दिल्ली सरकारचे माजी मंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते सत्येंद्र जैन यांना राऊस ॲव्हेन्यू कोर्टातून मोठा दिलासा मिळाला आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला आहे. तब्बल 18 महिन्यानंतर ते आता तुरुंगांतून बाहेर येणार आहेत.
अखेर दिल्ली कोर्टाकडून आज (दि.18 ऑक्टोबर) माजी मंत्री सत्येंद्र जैन या कोर्टाकडून जामीन मंजूर करण्यात आला. ईडीने सत्येंद्र जैन यांच्या जामिनीला विरोध केला होता, 18 महिने शिक्षा भोगल्याचे कारण देत न्यायालयाने 50 हजार रुपयांचा वैयक्तिक जातमुचलक जैन यांना जामीन देण्यात आला आहे. यादरम्यान देश सोडून जाऊ नये, असे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत.
AAP नेते सत्येंद्र जैन यांना मे 2022 मध्ये अंमलबजावणी संचालनालयाने (ED) अटक केली होती. जैन यांना गेल्या वर्षी मे महिन्यात आरोग्याच्या कारणास्तव जामीन मंजूर करण्यात आला होता. ते 10 महिने जामीनावर बाहेर होते, मात्र यावर्षी मार्चमध्ये सर्वोच्च न्यायालयात त्यांना आत्मसमर्पण करण्यास सांगितले. जैन यांनी 18 मार्च रोजी तुरुंगात आत्मसमर्पण केले. त्यानंतर अखेर त्यांना आज जामीन मंजूर झाला आहे.