Ankita Walawalkar : बिग बॉस मराठी सीझन 5 मध्ये अंतिम फेरीपर्यंत पोहोचलेली अंकिता वालावलकर सध्या चर्चेत आहे. कोकण हार्टेड गर्ल म्हणून ओळखली जाणारी अंकिता वालावलकर हिने नुकतीच सोशल मीडियावर प्रेमाची जाहीर कबुली दिली. बिग बॉस मराठीचा यंदाचा सीझन संपल्यानंतर अंकिता वालावलकरच्या लग्नाची जोरदार चर्चा होताना दिसत आहे.
दसऱ्याच्या दिवशी ‘सूर जुळले…’ असे कॅप्शन देत अंकिताने सोशल मीडियावर फोटो पोस्ट शेअर करत प्रेमाची जाहीर कबुली दिली. अंकिता लवकरच संगीत दिग्दर्शक कुणाल भगतबरोबर लग्नगाठ बांधणार आहे. कुणालने अनेक चित्रपट आणि मालिकांचं संगीत दिग्दर्शन केलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फेब्रुवारी महिन्यात अंकिता व कुणाल सिंधुदुर्गात लग्न करणार आहेत. अंकिताचा होणारा नवरा कुणालचे गाव अलिबाग असून अंकिता आता अलिबागची सून होणार आहे.
अंकितानेही कुणालला दसऱ्याच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत. अंकिताने इंस्टाग्रामवर फोटो शेअर करत त्याला कॅप्शन दिलंय, “प्रेम हे एकमेकांसाठी जगणं आहे हे तू सांगितलस, काळाच्या ओघात कळलच नाही. आयुष्य कसं कुठे बदललं, तू भेटलास आणि पुन्हा जगावसं वाटलं. वचन देते एका सुखी कौटुंबिक आयुष्याची तुझी सहचारिणी असेन. दसऱ्याच्या शुभेच्छा”.
View this post on Instagram
View this post on Instagram