मुंबई : महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांचे जावई समीर खान याचं निधन झालं आहे. अशा बातम्या काही वेळातच सगळीकडे वा-यासारख्या पसरल्या. मात्र, या बातमीची सत्यता नवाब मलिक यांनी स्वत: करत ती फेटाळली आहे.
या घटनेनंतर नवाब मलिक यांनी तात्काळ माध्यमांशी संवाद साधून जावईच्या प्रकृतीची सद्यस्थिती काय आहे ती सांगितली. तसेच माध्यमांशी बोलताना मलिक म्हणाले की, जावई समीर खान यांच्या प्रकृतीबाबत काहीही चुकीची माहिती पसरवली जात आहे. समीरची प्रकृती काल शनिवारी गंभीर होती परंत आज त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. तरी कृपया अशा अफवा पसरवू नका. तसेच आम्हा सर्वांना पाठिंबा दिल्याबद्दल आभारी आहोत.
तसेच पुढे बोलताना मलिक म्हणाले, सर्वांनी कृपा करुन संयम बाळगा आणि योग्य माहिती मिळाल्याशिवाय कसल्याही प्रकारची अफवा पसरवू नका. तसेच जावई समीर खानच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करा आणि माझ्या कुटुंबाला पाठिंबा द्या.
There’s been some misinformation circulating about my son-in-law’s condition. I want to clarify that while he was in a critical state yesterday, he has shown some improvement. Please avoid spreading rumors, and keep him in your prayers. Thank you for your support.
— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) October 13, 2024