लोणी काळभोर : पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील सेवा रस्त्यावर एकाने दसऱ्याच्या दिवशी दारूच्या नशेत गाडी पेटवून दिली असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. हा प्रकार कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील लोणी स्टेशन परिसरातील जानाई फ्लेक्सच्या जवळ शनिवारी (ता.12) सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडला आहे.
या घटनेत दुचाकी जळून खाक झाली आहे. या घटनेची माहिती मिळताच लोणी काळभोर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने गाडीला लागलेली आग विझवण्यात यश मिळवले आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस करीत आहेत.
View this post on Instagram