जामखेड : अल्पवयीन मुलीस धमकी देऊन तिच्यासोबत अंधारामध्ये बळजबरीने अत्याचार करण्याची घटना तालुक्यातील एका गावात नुकतीच घडली. अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या नातेवाईकांनी खर्डा पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी विरोधात अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, तालुक्यातील एका गावात १४ वर्षे ७ महिने वय असलेल्या अल्पवयीन मुलीवर आरोपी सचिन दिलीप काळे (वय १९, रा. खर्डा). याने ७ ऑक्टोबर रोजी दुपारी अत्याचार केला. आरोपीने फिर्यादीच्या घरासमोरील रोडच्या शेजारील टाकीजवळ पीडित मुलीस धमकी देऊन तिला अंधारामध्ये नेऊन बळजबरीने अत्याचार केला.
तसेच यापूर्वर्वीदेखील आरोपीने धाक दाखवून ऑगस्ट २०२४ मध्ये घरासमोरील टाकीजवळ बळजबरीने अत्याचार केला होता. याबाबत अल्पवयीन पीडित मुलीच्या नातेवाईकांनी खर्डा पोलीस स्टेशनला फिर्याद दिली आहे. खर्डा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय झंजाड व पोलीस कर्मचाऱ्यांनी आरोपी सचिन काळे (रा. खर्डा, ता. जामखेड) यास २४ तासांत अटक केली असून, त्याच्यावर खर्डा पोलीस स्टेशनला अत्याचार व पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय झंजाड करीत आहेत.