भरत रोडे
शिरूर : शिरूर तालुक्याच्या बेट भागात बिबट्याचे पाळीव प्राण्यावंरील हल्ले सुरू असून यामुळे मेंढपाळ, शेतकरी तसेच मजूरी करणारे कामागारांमध्ये भितीचे वातावरण आहे. शिरूर तालुक्यातील, कवठे येमाई या गावात पोकळदार वस्तीवर भाऊसाहे कचरू पोकळे यांच्या शेतात आज पहाटे ४ वाजता बिबट्याच्या हल्ल्यात घोडीचा मृत्यू झाला आहे. या घटनेचा वनकर्माचारी हनुमंत कारकूड यांनी पंचनामा केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पहाटे काहीतरी गोंगांटाचा आवाज झाल्याने पोकळे कुटूंब उठले, त्यावेळी त्यांना बिबट्याने घोडीवर हल्ला केल्याचे दिसून आले. त्यावेळी अंधाराचा फायदा घेत बिबट्या पसार झाला. भाऊसाहेब पोकळे यांच्या बैलगाडा शैर्यतीतील घोडी सुमारे ५० हजार रुपये किंमतीची असावी. शाळेतील लहान मुले व मोल मजूर करणाऱ्या शेतकरी महिला यांच्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
कवठे येमाई या परिसरात उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे बिबट्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात आढळून येते. उसामध्ये नेहमी हे प्राणी आढळून येतात. आपल्या अन्नाच्या शोधात हे प्राणी मानवी वस्तीत ही शिरल्याचे आढळून आले आहेत. त्यामुळे शेतकऱ्याचे पशुधन धोक्यात आले आहे. त्याच प्रमाणे नागरिकांना आपल्या जीवाचे व लहान मुलांचे स्वरक्षण करणेही कठीण झाले आहे. बिबट्याची वाढती संख्या ही खूप मोठी चिंतेची बाब आहे. भविष्यात शेती करावी कशी हा गंबीर मुद्दा उपस्तित होण्याच्या मार्गावर आहे.
या घटनेचा पंचनामा वन कर्मचारी हनुमंत कारकूड यांनी केला. शेतकऱ्याच्या मृत पशुधनाचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात येईल व नियमाप्रमाणे भरपाई मिळेल. असा विश्वास शिरूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रताप जगताप यांनी सांगितले.