राहुलकुमार अवचट
यवत : बँकेचे एटीएम डेबिट कार्ड काढून न दिल्याच्या कारणावरून राहु (ता. दौंड) येथील इको बँकेच्या असिस्टंट मॅनेजरला दुचाकीवरून आलेल्या सहा जणांनी लाकडी दांडक्याने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली आहे. याप्रकरणी यवत पोलीस ठाण्यात 6 जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
विष्णुदास दामोदरम पेरीयाडात असे मारहाण झालेल्या बँकेच्या असिस्टंट मॅनेजरचे नाव आहे. तर त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार यवत पोलिसांनी महेश शिवाजी हंबिर (रा. पाटेठाण, ता. दौंड), ओंकार शांताराम गायकवाड (रा. मेमाणवाडी टाकळी भिमा, ता. दौंड) व इतर 4 अनोळखी तरुणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला
यवत पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी (ता. 03) इको बँकेचे असिस्टंट मॅनेजर विष्णुदास पेरीयाडात हे रस्त्याने निघाले होते. यावेळी सव्वा पाच वाजण्याच्या सुमारास महेश हंबिर, ओंकार गायकवाड व इतर 4 अनोळखी जणांनी दुचाकीवरून आले व पेरीयाडात थांबवले.
यावेळी त्यांनी बँकेचे एटीएम डेबिट कार्ड काढून न दिल्याच्या कारणावरून शिवीगाळ करत लाकडी दांडक्याने मारहाण केली तर दोन सहकाऱ्यांनी जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी विष्णुदास पेरीयाडात यांनी दिलेल्या तक्रारीनुसार यवत पोलीस ठाण्यात 6 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हवालदार कद हे करत आहेत.