नवी दिल्ली : सध्या फेसबुकचा वापर वाढताना दिसत आहे. त्यानुसार, युजर्सच्या फायद्यासाठी अनेक फीचर्स आणले जात आहेत. त्यात आता फेसबुकने मॉनिटायझेशन प्रोग्राम लाँच केला आहे. मेटाच्या नवीन अपडेटअंतर्गत, आता तीन क्रिएटर मॉनिटायझेशनऐवजी केवळ एकच मॉनिटायझेशन प्रोग्राम प्लॅटफॉर्मवर आणला गेला आहे.
मेटाने दिलेल्या माहितीत म्हटले होते की, क्रिएटर्स सध्या प्लॅटफॉर्मवरून पूर्ण क्षमतेने पैसे कमावत नाहीत. अशा परिस्थितीत क्रिएटर्सच्या सोयीसाठी नवीन मॉनिटायझेशन प्रोग्राम सुरू करण्यात आला आहे. याद्वारे, क्रिएटर्सना व्हिडिओ, रील आणि फोटो, मजकूर फोटोंद्वारे सहजपणे चांगले कमाई करणे शक्य होईल.
मेटाच्या मते, नवीन मॉनिटायझेशन प्रोग्राम सध्याच्या प्रोग्रामप्रमाणेच काम करेल. क्रिएटर्स व्हिडिओ, फुल लेंथ व्हिडिओ, फोटो, मजकूर फोटो आणि रील्सद्वारे सहज कमाई करण्यास सक्षम असतील. तसेच, क्रिएटर्स कामगिरीवर आधारित पेआउट मॉडेलद्वारे कमाई करत राहतील.
असा मिळेल फायदा…
मेटाचा मॉनिटायझेशन प्रोग्राम सध्या फक्त बीटा व्हर्जनमध्ये उपलब्ध आहे. अशा स्थितीत, पुढील वर्षी ते सर्वांसाठी लाँच केले जाण्याची शक्यता आहे. रिपोर्ट्समध्ये असे म्हटले की, या आठवड्यात मेटा पहिल्यांदा बीटा टेस्टमध्ये सहभागी असलेल्या क्रिएटर्सना इनव्हिटेशन पाठवेल. अशाप्रकारे, सुमारे 10 लाख क्रिएटर्स याच्याशी जोडले जातील, जे आधीच प्लॅटफॉर्मद्वारे कमाई करत आहेत.