पती-पत्नी असो की गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड या नात्यांमध्ये विश्वास हा अत्यंत महत्त्वाचा असतो. पण हाच विश्वास जर कमी अधिक राहिल्यास त्याने नात्यात दुरावा येऊ शकतो. जर तुमचा जोडीदार तुमच्यावर संशय घेत असेल तर त्याचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न करा. त्यासाठी काही गोष्टींचा अवलंब केल्यास नक्कीच फायद्याचे ठरू शकते.
नात्यात कधी गोपनीयता तर कधी पारदर्शकता राखून नात्यात समतोल राखला जातो. जर तुमच्या नात्यात संशय निर्माण झाला असेल तर जोडीदाराशी त्याबद्दल बोलावे. तसेच, गोपनीयता आणि पारदर्शकता या दोन्हींचे रक्षण करण्यासाठी चर्चा झाली पाहिजे. कोणती माहिती सामायिक करावी आणि कोणती खाजगी राहावी यावर सहमती व्हावी. दोघांनीही प्रामाणिकपणा राखण्यासाठी सतत काम केले पाहिजे. जेव्हा जोडीदाराला एकमेकांच्या कृती आणि हेतूंबद्दल सुरक्षित आणि आत्मविश्वास वाटतो तेव्हा विश्वास वाढतो. त्यामुळे नेहमी गैरसमज टाळण्याचा प्रयत्न करा.
वैयक्तिक आदर-सन्मान करा. सतत एकमेकांची चौकशी करण्याऐवजी तुमच्या जोडीदाराच्या वैयक्तिक भावनांचा आदर-सन्मान करा. पर्सनल स्पेसचा आदर करणे आपल्यासाठी चांगले आहे आणि आपल्या नातेसंबंधाच्या आरोग्यासाठी चांगले आहे.