मुंबई : बदलापूर शाळेतील दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार केल्या प्रकरणी सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. बदलापुरातील संबंधित शाळेचे अध्यक्ष उदय कोतवाल आणि सचिव तुषार आपटे यांना पोलिसांना अटक केली आहे. कर्जत परिसरातून या दोघांच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहे. मागील महिनाभरापासून उदय कोतवाल आणि तुषार आपटे फरार होते.
बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणी शाळा चेअरमन उदय कोतवाल आणि सचिव तुषार आपटे या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या दोघांनी हायकोर्टामध्ये अटकपूर्वी जामीन अर्ज दाखल केला होता. पण मंगळवारी हायकोर्टाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. ठाणे पोलिसांनी कर्जत परिसरातून दोघांना ताब्यात घेतलं आहे. या दोघांनाही उद्या गुरुवारी कोर्टात हजर करणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.