बदलापूर : बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा अखेर 6 दिवसानंतर काल रविवारी (दि.29) उल्हासनगरच्या शांतीनगर स्मशानभूमीत दफनविधी पार पडला. त्याठिकाणी पोलीसांकडून रात्रंदिवस पहारा ठेवण्यात आला आहे.
अक्षय शिंदेच्या दफन विधीस शिवसेनेचा शिंदे गटाने विरोध केला होता, त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून आरोपी अक्षय शिंदेला दफन करण्यात आलेल्या स्मशानभूमीत पोलीसांकडून सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. पोलिसांकडूनही स्मशानभूमीत बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.