मुंबई : पश्चिम रेल्वेने प्रवास करणा-या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. पश्चिम रेल्वेवरील सहाव्या मार्गिकेचे काम सुरू असून या कामासाठी आज सोमवारी ब्लॉक घेण्यात येणार आहे. हे काम अंतिम टप्प्यात येऊन पोहोचले आहे. त्यामुळे पश्चिम रेल्वेकडून 4 ऑक्टोबरपर्यंत 150 ते 175 लोकल रद्द होणार आहेत. त्यामुळे आठवड्याच्या पहिल्याच दिवशी प्रवाशांचे हाल होणार आहेत.
गोरेगाव आणि कांदिवली दरम्यान सहाव्या मार्गाच्या प्रकल्पांचा अंतिम टप्पा सुरू होत आहे. 30 सप्टेंबरपासून राम मंदिर रोड, गोरेगाव आणि मालाड स्थानकादरम्यान अप आणि डाऊन लोकल आणि अप व डाऊन या चारही मार्गावर ताशी 30 किमी वेगाचे निर्बंध लागू केले जातील. लोकलचा वेगाचा फटका दररोजच्या प्रवासावर पडू शकतो. तसंच, लोकलच्या फेऱ्याही रद्द केल्या जाणार आहेत.
रेल्वेच्या अधिका-यांच्या माहितीनुसार, राम मंदिर स्टेशन ते मालाड दरम्यान 30 किमी प्रतितास वेगाने लोकल चालवल्या जातील. यामुळे चाकरमान्यांचे हाल होण्याची शक्यता आहे. पश्चिम रेल्वेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला असून अनेक लोकल रद्द तर काही लोकलच्या वेळेत बदल करण्यात आला आहे.
To facilitate the construction of the 6th Line between Goregaon and Kandivali Stations, a block of 4 hrs will be taken on the UP & DOWN Fast lines at Goregaon and UP & DOWN Fast & Slow lines at Malad on the intervening night of 30th September/1st October 2024.#WRUpdates pic.twitter.com/oWcOFIgrzW
— Western Railway (@WesternRly) September 29, 2024