काठमांडू : गेल्या दोन-तीन दिवसांपासून नेपाळमध्ये मुसळधार पाऊस सुरु आहे. या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. या पुरामुळे मृतांची संख्या 112 वर पोहोचली आहे. तर 60 जण जखमी झाले.
या ठिकाणी नद्यांच्या काठावर वसलेल्या भागात मोठ्या प्रमाणात विध्वंस झाला आहे. घरे उद्ध्वस्त झाली असून जीवितास धोका वाढला आहे. कोसी, गंडक, कमला बालन, बागमती, गंगा आणि बुढी गंडक या नद्यांच्या पाणी पातळीने अनेक ठिकाणी धोक्याचा टप्पा ओलांडला आहे. बिहार सरकारने राज्याच्या मध्य आणि उत्तर भागात पुराचा इशारा दिला आहे. मध्य प्रदेशात मुसळधार पावसानंतर क्षिप्रा नदीला पूर आला असून उज्जैनमधील अनेक भागात पूर आला आहे. हिमाचलमध्येही पावसामुळे 27 रस्ते बंद आहेत.
यावेळी नेपाळ पोलिसांनी सांगितले की, नेपाळमध्ये सुरु असलेल्या सततच्या पावसामुळे आतापर्यंत 112 लोकांचा मृत्यू झाला आहे, त्यापैकी 34 जण काठमांडू खोऱ्यात मृत पावले आहेत. या पुरात 60 जण जखमी झाल्याचेही त्यांनी सांगितले. तर 12 जण लोक बेपत्ता आहेत.
देशातील आपत्कालीन स्थिती लक्षात घेता पंतप्रधान प्रकाश मान सिंह यांनी गृहमंत्री, गृहसचिव आणि सुरक्षा संस्थांच्या प्रमुखांसह विविध मंत्र्यांची तातडीची बैठक बोलावली. शोध कार्य आणि बचाव कार्य तीव्र करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
Nepal Floods | Death toll rises to 112 after torrential rainfall-induced landslide and flooding sweeps across the country, dozens missing: Armed Police Force and Nepal Police database
— ANI (@ANI) September 29, 2024