लोणी काळभोर, (पुणे) : लोणी काळभोर येथील एंजल हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या 19 वर्षाखालील मुलींच्या संघाने जिल्हास्तरीय हॉकी स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला. पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व पुणे जिल्हा परिषद आयोजित जिल्हास्तरीय हॉकी स्पर्धा एस. एन .बी .पी .स्कूल चिखली या मैदानावर संपन्न झाल्या. या स्पर्धेसाठी पुणे जिल्ह्यातील हॉकी संघ सहभागी झाले होते. हॉकी स्पर्धेत एंजल हायस्कूल व जुनियर कॉलेजचा 19 वर्षाखालील मुलींच्या संघाने द्वितीय क्रमांक पटकावला.
विजयी संघाचे ओम एज्युकेशन सोसायटीचे सचिव सचिन अग्निहोत्री, संस्थेच्या संचालिका इराणी मॅडम, संचालक अविनाश शेलूकर, एंजल हायस्कूल व जुनिअर कॉलेजच्या प्राचार्या खुशबू सिंग ,एंजल हायस्कूलचे प्राचार्या शमशाद कोतवाल, उपप्राचार्या झिमली लोध, एंजल हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या व्यवस्थापिका नंदा डोंगरे यांनी केले.
दरम्यान, विजयी संघास एंजल हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज चे क्रीडा विभाग प्रमुख भाऊसाहेब महाडिक, क्रीडा शिक्षक दीपक गिरी, क्रीडा शिक्षक रवींद्र दंडाले, क्रीडा शिक्षक अभय मदने, क्रीडा शिक्षिका अनिता यादव, क्रीडा शिक्षिका कमल कसबे यांचे मार्गदर्शन लाभले.