पुणे : ‘नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड’ नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला 42 हजारांपर्यंत पगार मिळू शकणार आहे.
‘नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड’ येथे लेखापाल या पदावर भरती केली जात आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला पगारही चांगला मिळणार आहे. पण यात 38 वर्षांपर्यंत वय असणाऱ्या उमेदवारालाच अर्ज करता येणार आहे. संबंधित उमेदवाराची निवड ही चाचणी परीक्षा, मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : लेखापाल.
– एकूण रिक्त पदे : 01 पदे.
– नोकरीचे ठिकाण : नागपूर.
– शैक्षणिक पात्रता : वाणिज्य पदवीधर.
– वयोमर्यादा : कमाल 38 वर्षे.
– वेतन / मानधन : दरमहा रु. 42,000/-.
– अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन.
– अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख : 24 सप्टेंबर 2024.
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : 02 ऑक्टोबर 2024.
– या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी http://www.nsscdcl.org/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.