नवी दिल्ली : सोने-चांदीच्या दरात मोठी वाढ झाल्याचे मंगळवारी पाहिला मिळाले. परदेशातील बाजारातील मजबूतीमुळे मंगळवारी राष्ट्रीय राजधानीत सोन्याचा भाव 76,950 रुपये प्रति 10 ग्रॅमवर स्थिर राहिला. तर सोमवारी सोन्याने सहा महिन्यांच्या कालावधीनंतर 76,950 रुपयांचा सार्वकालिक उच्चांक गाठला होता.
सोने-चांदीच्या व्यापाऱ्यांनी सांगितले की, यावर्षी 22 मार्च रोजी सोन्याने 76,950 रुपयांची विक्रमी पातळी गाठली होती. ग्राहकांच्या मागणीमुळे चांदीही 90,000 रुपये प्रतिकिलोपर्यंत मजबूत झाली. याशिवाय 99.5 टक्के शुद्धतेचे सोनेही 76,600 रुपये प्रति 10 ग्रॅमवर स्थिर राहिले. दिल्लीच्या बाजारात स्पॉट गोल्ड (24 कॅरेट) किमती 76,150 रुपये प्रति 10 ग्रॅम या सर्वकालीन उच्चांकावर व्यवहार करताना दिसल्या.
असे असले तरी पुण्यात सध्या 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचे दर 74,930 रुपये असून, मागील ट्रेडमध्ये ही किंमत मोठ्या फरकाने वाढली आहे. तर 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचे दर 69,350 रुपये झाला आहे. तर चांदीचे दर प्रतिकिलो 90,500 रुपयांवर गेले आहेत.