मुंबई : देशभर आणि राज्यात ज्या प्रकरणाने संतापाची लाट निर्माण झाली होती, त्या बदलापूर अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणातील प्रमुख आरोपी अक्षय शिंदे याचं एन्काऊंटर करण्यात आलं आहे. अक्षय शिंदेने पोलिसांवर गोळीबार केला होता, त्यानंतर आत्मसंरक्षणात्मक कारवाईत त्याचं एन्काऊंटर करण्यात आलं आहे. अक्षय शिंदेच्या या एन्काऊंटरनंतर राज्यातून सर्वच स्तरातून वेगवेगळ्या प्रतक्रिया समोर येत आहेत. आता शिवसेना उबाठा गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी एक व्हिडीओ एक्सवर पोस्ट करून घटनेच्या आधी अक्षय शिंदेंची परिस्थिती कशी होती? हे दाखवले आहे.
संजय राऊत यांनी एक व्हिडीओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलयं की, ज्यामध्ये पोलिसांनी त्याचे हात बांधलेले आणि तोंडावर काळे फडके बांधलेले दिसत आहे. “अक्षय शिंदे याला पोलिस घेऊन जात होते तेव्हा त्याचे हात बांधलेले व तोंडावर बुरखा होता. त्यामुळे नक्की काय घडले? कुणाला वाचविण्यासाठी शिंदे – फडणवीस हा बनाव करत आहेत? महाराष्ट्राला सत्य कळायलाच हवे।”.असे म्हणत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.
दरम्यान, यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी एक्सवर पोस्ट करत म्हटले, “बदलापूर येथे दोन चिमुरड्यांवर झालेल्या अन्यायाला न्याय मिळण्यासाठी कायद्याच्या योग्य चौकटीतून फाशी झालीच पाहीजे होती. परंतू या घटनेतील मुख्य आरोपीला स्थलांतरीत करताना गृह विभागाने दाखवलेला हलगर्जीपणा संशयास्पद आहे. भविष्यात अशा निंदनीय कृत्याची कल्पनाही कोणाच्या मनाला शिवणार नाही यासाठी कायद्याचा धाक घालण्यात शासन दुर्बल ठरलंय, असे भासते. या घटनेच्या सखोल चौकशीतून वस्तूस्थिती समोर येणं अपेक्षित आहे.”
नेमकं काय घडलं?
अक्षय शिंदे याला पोलीस कोठडीत घेऊन जाण्यात येत होते. त्यावेळी त्याने पोलिसांची रिव्हॉल्व्हर हिसकावून गोळीबार केला. त्याला रोखण्याचा प्रयत्न करताना एक पोलीस कर्मचारीही जखमी झाला. यानंतर संरक्षणासाठी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात अक्षय शिंदे यांचा मृत्यू झाला आहे.
याने पोलिसांवर हल्ला केला?
अक्षय शिंदे याला पोलिस घेऊन जात होतेतेव्हा त्याचे हात बांधलेले व तोंडावर बुरखा होता.
त्यामुळे नक्की काय घडले?
कुणाला वाचविण्यासाठी शिंदे फडणवीस हा बनाव करत आहेत?
महाराष्ट्राला सत्य कळायलाच हवे।
@Dev_Fadnavis pic.twitter.com/wo2dvqoBBs— Sanjay Raut (@rautsanjay61) September 24, 2024
बदलापूर येथे दोन चिमुरड्यांवर झालेल्या अन्यायाला न्याय मिळण्यासाठी कायद्याच्या योग्य चौकटीतून फाशी झालीच पाहीजे होती. परंतू या घटनेतील मुख्य आरोपीला स्थलांतरीत करताना गृह विभागाने दाखवलेला हलगर्जीपणा संशयास्पद आहे. भविष्यात अशा निंदनीय कृत्याची कल्पनाही कोणाच्या मनाला शिवणार नाही…
— Sharad Pawar (@PawarSpeaks) September 23, 2024