मुंबई : बारावीनंतर पदवीसाठी असलेला अभ्यासक्रम तीनच्या ऐवजी चार वर्षांचा होणार असल्याचे विश्वविद्यालय अनुदान आयोगाने (युजीसी) जाहीर केले आहे. देशातील सर्वच शैक्षणिक संस्थांना हा निर्णय पुढील वर्षांपासून लागू होणार आहे.
सध्याच्या घडीला बारावीनंतर पदवी पर्यंतचा अभ्यासक्रम तीन वर्षांचा होता. या अभ्यासक्रमात आता मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आला आहे. यामुळे तीन वर्षात होणारा पदवी अभ्यासक्रमाला चार वर्षांचा कालावधी लागणार आहे. पुढील आठवड्यापासून याबाबतची सर्व माहिती सर्व विद्यापीठाना पाठविण्यात येणार असून यात ४५ केंद्रीय विद्यापीठांचा समावेश आहे.
विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी हा निर्णय घेतला असून सर्व विद्यापीठे व डीम्ड विद्यापीठे देखील या निर्णय स्वीकारण्यास तयार झाली असल्याचे युजीसीने स्पष्ट केले आहे.