विजय लोखंडे
वाघोली : शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्ष प्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली व पुणे जिल्हा संपर्क प्रमुख सचिन अहिर यांच्या आदेशाखाली हवेली तालुक्यात शिवसेनेच्या गावभेट दौऱ्याला आम्ही सुरुवात केली आहे. यातून तालुक्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष संघटन वाढविण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असून यापुढे तालुक्यात कार्यकर्त्यांचे दाट जाळे निर्माण करण्याचा आमचा संकल्प आहे. तालुक्यात गावोगावी व घर तेथे शिवसेना पक्ष पोहोचविण्याचे आमचे ध्येय असल्याचे हवेली तालुका प्रमुख युवराज दळवी यांनी सांगितले.
राज्यात विधानसभा निवडणुकां काही दिवसांवर येऊन ठेपल्याने सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. त्याच अनुषंगाने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने हवेली तालुका प्रमुख युवराज दळवी यांच्या अधिपत्याखाली शिवसेनेचे तालुक्यातील सर्व पदाधिकारी, विविध आघाड्यांचे पदाधिकारी, शिवसेनेच्या अंगीकृत संघटना, शिवसेनेचे सर्व कार्यकर्ते, शिवसैनिक यांच्या प्रमुख उपस्थितीत गाव भेट दौऱ्यास वाघोली-भावडी गावापासून सुरूवात केली आहे.
या गाव भेट दौऱ्याला प्रत्येक गावातील विविध पदाधिकारी, नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे युवराज दळवी यांनी सांगितले. रविवारी या दौऱ्याचा शुभारंभ हवेली तालुक्यातील भावडी या गावापासून तर आव्हाळवाडी वाघोली येथे सायंकाळी नऊ वाजता पहिल्या दिवसाचा समारोप झाला आहे. यावेळी हवेली तालुका प्रमुख युवराज दळवी, महिला आघाडी पुणे जिल्हा प्रमुख पूनम पोतले, जिल्हा सल्लागार राजेंद्र पायगुडे, वाहतूक सेनेचे उपजिल्हा प्रमुख राजेंद्र तांबे, विभाग प्रमुख किशोर पाटोळे यांच्यासह आदी विविध पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.
आमच्या हवेलीतील शिवसेनेच्या पदाधिकारी,कार्यकर्त्यांनी शिवसेना गावोगावी,घरोघरी पोहोचविण्यासाठी गाव भेट दौरा काढला असून त्यानंतर आम्ही शिवसेनेचे पुणे जिल्हा संपर्क प्रमुख सचिन अहिर,जिल्हाप्रमुख खांडेभराड यांच्या प्रमुख उपस्थितीत हवेली तालुका प्रमुख युवराज दळवी व शिरूर तालुका प्रमुख पोपट शेलार यांना सोबत घेऊन शिरूर-हवेली विधानसभा मतदार संघाचा शिवसैनिकांचा भव्य जाहीर मेळाव्याचे आयोजन लवकरच करणार आहोत.
– संजय सातव पाटील, माजी उपजिल्हा प्रमुख तथा माजी सदस्य जिल्हा नियोजन समिती