पुणे: गेल्या महिन्यापासून पालेभाज्यांचे भाव गगनाला भिडले होते. रविवारी गेल्या आठवड्याच्या तुलनेत कोथिंबीर आणि मेथीच्या भावात मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे. भावात घसरण झाली असली, तरीही कोथिंबीर आणि मेथीचे भाव अद्यापही सामान्यांच्या आवाक्याबाहेरच आहेत. कोथिंबीर मेथीसह चाकवत, अंबाडी, मुळे आणि पालकच्या भावात घसरण झाली आहे.
तर, शेपू, कांदापात, करडई, पुदिना, राजगिरा, चुका आणि चवळईचे भाव स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. गुलटेकडी मार्केट यार्डातील घाऊक बाजारात रविवारी (दि. २२) कोथिंबिरीची सुमारे दीड लाख जुडी, तर मेथीची ४० हजार जुडींची आवक झाली होती. किरकोळ बाजारात कोथिंबीर २० ते ३० रुपयांना विक्री केली जात आहे. तर, मेथीची देखील २० ते ३० रुपयांना विक्री केली जात आहे.
पालेभाज्यांचे शेकड्यातील भाव
कोथिंबीर : १०००-२०००, मेथी १५००-२०००, शेपू : ८००-१५००, कांदापात १२००-२०००, चाकवत: ५००-८००, करडईः ५००-८००, पुदिना ५००-१०००, अंबाडी: ५००-७००, मुळेः ८००-१५००, राजगिरा : ४००-८००, चुका: ६००-१०००, चवळई: ५००-८००, पालक: १२००-१५००.