दौंड : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विकास कार्याप्रती आकर्षित होत व नेतृत्वावर विश्वास ठेवून दौंड तालुक्यातील तरुणांनी पूणे जिल्हा शिवसेना प्रमुख महेश पासलकर यांच्या उपस्थितीत शिवसेना मध्यवर्ती कार्यालय, चौफुला येथे शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र आज वेगाने प्रगती करत आहे, पुढील काळात शिंदे यांचे हात आणखी बळकट करून उद्याच्या महाराष्ट्राच्या जडणघडणीत आपलाही खारीचा वाटा असावा या हेतूने महाराष्ट्राला अधिक गतिशील बनवण्यासाठी आम्ही मुख्यमंत्र्यासोबत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
यावेळी सागर टुले, बापु वाघमोडे, सम्राट कांबळे, नितीन काळे, किशोर गरदडे, बाळा मोरे, अतुल शेलार, नितीन ढगे, कुर्बान पटेल, मंगेश साळुंके, नागेश सोनवणे, साहिल गायकवाड, उमेश वाघमोडे, तेजस दंडे, गणेश कांबळे, गणेश नेवसे, राज चौधरी, संभाजी गायकवाड, भाऊ लोखंडे, गणेश मोरे, प्रशांत घाडगे, अक्षय लाड यांनी सांगितले.यावेळी शिवसेना केडगाव शहरप्रमुख आशिषजी गायकवाड, शिवसेना उप जिल्हाप्रमुख विजयसिंह चव्हाण, शिवसेना तालुका संघटक सचिनदादा दोरगे, शिवसेना तालुका क्षेत्रप्रमुख हनुमंतराव निगडे सह अनेक पदाधिकारी उपास्थित होते.