-भरत रोडे
कवठे येमाई : राज्यात विविध ठिकाणी महिलांवर, चिमुकल्यांवर बलात्कार, अत्याचाराच्या घटना घडल्या आहेत. त्याचा परिणाम श्री गणेश विसर्जन मिरवणुकीत पहावयास मिळाला. शिरूर तालुक्यातील कवठे येमाई येथे श्री गणेश विसर्जन मिरवणुकीत बाल लैगिंक अत्याचार आणि इतिहासकालीन कायद्यांवर भर देत गणेश मंडळांनी पथनाट्य सादर केले. छत्रपती शिवाजी महाराज की जय व गणपती बाप्पा मोरया च्या जयघोषात भाविक भक्त व ग्रामस्थांनी विद्युत रोषणाईत लाडक्या बाप्पाला निरोप दिला. या विसर्जन मिरवणुका शांततेत पार पडल्या.
कवठे येमाई ( ता. शिरूर ) येथील पिरसाहेब गणेश मित्र मंडळाने श्री छत्रपती शिवाजी महाराजांवर पथनाट्य सादर केले. यामध्ये बलत्कारातीत आरोपीला शिव कालीन कायदा कसा होता? या बाबत ऐतिहासिक प्रसंग दाखवण्यात आला. सर्व भाविक भक्तांचे या पथनाट्याने लक्ष वेधत कौतुक केले. या पथनाट्यात श्री छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका रुपेश नागरे, पंथ म्हणून वैभव दळवी तर पाटलाची भूमिका राजेश पोपळघट यांनी साकारली. यामध्ये निलेश बोडरे, अतुल कुळके, गणेश दळवी, गणेश मुसुगडे, विशाल दळवी, विशाल बांगर, योगेश बांगर, इस्माईल पठाण, प्रगती दळवी, मानसी दळवी यांनी देखील भुमिका साकारल्या.
येथील नवज्योत मित्र मंडळ यांनी बाल लैंगिक अत्याचार या विषयावर पथनाट्य सादर करत राजे तुम्ही परत या…हे पथनाट्य सादर केले. लेखक – मोहन पडवळ, संगीत व गायक भरत रोडे, निवेदक- सचिन शिंदे ,परी – सानिका भरत रोडे, प्रियांका भरत रोडे , पिंकी – तनिष्का सोपान उचाळे ,रणवीर कमलेश बोरा, छत्रपती शिवाजी महाराचंची योगेश शरद कदम यांनी भुमिका साकारली.
येथील इतर मंडळांनी विद्युत रोषणाईत श्री गणेश विसर्जन मिरवणूक शांततेत पार पडली.