पुणे : रासे गावच्या (दि. १९) हददीत मुंगसे बस्ती ओढया जवळ एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. याबाबत माहिती मिळताच चाकण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृत व्यक्तीच्या चेह-यावर मारहाण करुन जखमा करुन, त्याचा चेहरा छिन्नविच्छीन्त्र केलेल्या अवस्थेत दिसून आला. पोलिसांनी तपासाचे चक्र फिरवत, या गुन्हयातील कटाचा सुत्रधार व मुख्य आरोपी यांना अटक करण्यात आली आहे. गुन्हे शाखा युनिट तीन व चाकण पोलीस स्टेशन यांनी ही संयुक्त कारवाई केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संदिप शिवाजी खंडे, (वय ४० वर्षे, रा. ठाकरवाडी रासे ता. खेड जि. पुणे) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ तपासाचे चक्रे फिरवुन मयताच्या सोबत दिनांक १८ सप्टेंबर रोजी दिवसभर व रात्री कोण सोबत होते, त्याचे कोणाशी वाद होते काय, याबाबत माहिती घेतली असता गोपनीय बातमीदार यांचेकडुन खात्रीशीर माहिती मिळाली की, संशयीत सुरेश मेंगाळ याने सदर खुन केलेला आहे.
तात्काळ सुरेश मेंगाळ यास डि. बी. पथकाने ताब्यात घेवुन त्याच्याकडे विचारपुस केली असता त्याने प्रथम उड़वा उडवीची उत्तरे दिली, परंतु त्याचे बोलण्यामध्ये वारंवार विसंगती आढळत असल्याने त्याच्याकडे सखोल तपास केला असता त्याने सांगीतले की, “मागील सहा महिन्यापासून माझा दुरचा मामा संदिप शिवाजी खंडे हा छोट्या मोठ्या कारणावरुन मला लोकांसमोर वाकडे तिकडे बोलून मारहाण शिवीगीळ करत होता, त्यामुळे मी सहा महिन्यापासून त्याला एकांतात बघुन कायमचा संपविण्याचा विचार करत होतो.”
पुढे त्याने सांगितले की, “काल रोजी अगोदरच दारु पिला असल्याने त्याला गोड बोलुन रासे गावच्या ओढयाच्या जवळ निर्जन स्थळी नेवुन पुन्हा त्यास दारु पाजुन झोपवले, त्यानंतर पुन्हा गावात देशी दारु आणण्यासाठी गेलो. तेंव्हा तेथे मला माझा जवळचा मित्र दिलीप ऊर्फ टपाल अधान हा भेटला तेव्हा मी त्यास तु मला संदिप खंडे यास मारण्यासाठी मदत्त कर असे सांगीतल्याने तो तयार झाला. मी व टपाल दारु घेवुन त्याला झोपवलेल्या ठिकाणी आलो. टपाल याने जवळ असलेल्या लाकडी दांडक्याने संदिप ऊर्फ बाळशीराम याच्या तोंडावर लाकडी दांडक्याने जोर जोरात मारहाण केली. त्यानंतर मी हाताने त्याचा जीव जाईपर्यंत गळा आवळाला. त्याची पुर्ण हालचाल थांबल्यानंतर त्याला बाजुचे झुडपात ढकलून दिले.”
आरोपी सुरेश ज्ञानेश्वर मेंगाळ (वय ३७ वर्षे, रा. ठाकरवस्ती रासे, ता. खेड जि. पुणे) याने चाकण पोलिसांकडे खुनाची कबुली दिली. तसेच युनिट ३ गुन्हे शाखा, पिंपरी चिंचवड यांच्या कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश गायकवाड व त्यांच्या पथकाने यातील दुसरा आरोपी दिलीप ऊर्फ टपाल पांडुरंग अघान याला ताब्यात घेतले आहे.
सदरची कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त शशिकात महावरकर, अपर पोलीस आयुक्त, वसंत परदेशी, पौलीस उप आयुक्त, परिमंडळ ३ डॉ. शिवाजी पवार, सहा. पोलीस आयुक्त, राजेंद्रसिंह गौर यांचे सुचना व मार्गदर्शना खाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश गायकवाड व पथक, पोनि गुन्हे नाथा घार्गे, डी बी पथकाचे सपोनि प्रसंन्न ज-हाड, कुंदा गावडे, गणपत धायगुडे, पोसई अभिजीत चौगुले, संदिप बोरकर, सचिन मोरखंडे, प्रकाश कातकाडे, पोलीस अंमलदार हनुमंत कांबळे, भैरोबा यादव, सुनिल शिंदे, शिवाजी चव्हाण, सुदर्शन बर्डे, सुनिल भागवत, महेश कोळी, उध्दव गर्जे, महादेव बिक्कड, रेवनाथ खेडकर, शरद खैरणार, नितीन गुंजाळ, मंगेश फापाळे यांनी केलेली आहे. सदर गुन्हयाचा अधिक तपास चालु आहे.