नवी दिल्ली : प्रसिद्ध कंपनी DJI ने आपला नवीन Neo Compact ड्रोन लाँच केला. या ड्रोनमध्ये अनेक बेस्ट असे फीचर्स देण्यात आले आहेत. यामध्ये AI आधारित ट्रॅकिंग, क्विक शॉट्स, 4K अल्ट्रा स्टॅबिलाइज्ड व्हिडिओ रेकॉर्डिंग आणि रिमोटलेस ऑपरेशन इत्यादीसारख्या अनेक बेस्ट फीचर्सचा समावेश आहे. हा ड्रोन स्मार्टफोनशी देखील जोडता येऊ शकतो.
DJI कंपनी या ड्रोनसोबत अनेक महत्त्वाच्या अॅक्सेसरीजही देत आहे. यात 1/2 इंच इमेज सेन्सर देण्यात आला असून, जो 12MP पर्यंत फोटो काढू शकतो. हे 30fps वर 4K रिझोल्यूशनमध्ये अल्ट्रा-स्टेबलाईज्ड व्हिडिओ रेकॉर्ड करू शकते. कंपनीचा दावा आहे की, रेकॉर्डिंग पूर्ण झाल्यानंतर ते ऑटोमॅटिक खाली येतो. हा आतापर्यंतचा सर्वांत हलका आणि कॉम्पॅक्ट ड्रोन आहे, ज्याचे वजन फक्त 135 ग्रॅम आहे. यात AI ट्रॅकिंग फीचर आहे.
ड्रोन 6 फ्लाय पॅटर्नसह फुटेज कॅप्चर करू शकतो. बूमरँग, सर्कल, ड्रोनी, हेलिक्स, रॉकेट आणि स्पॉटलाईट ज्यासाठी क्विकशॉट्स फीचर्स देण्यात आले आहे. हे रिमोट कंट्रोलशिवाय देखील ऑपरेट करता येऊ शकतो. डीजेआय फ्लाय अॅप, रिमोट कंट्रोलर, आरसी मोशन, डीजेआय गुगल यासोबत कनेक्ट केले जाऊ शकते.