नवी दिल्ली : टेलिकॉम कंपन्यांकडून दोन महिन्यांपूर्वीच सर्व रिचार्ज प्लॅनचे दर वाढवण्यात आले आहेत. पूर्वीच्या तुलनेत 25 टक्क्यांनी ही वाढ झाली आहे. असे असताना आता येत्या काही दिवसांत टेलिकॉम कंपन्या पुन्हा एकदा यूजर्सला मोठा धक्का देणार असल्याचे म्हटले जात आहे. ट्रायच्या नव्या धोरणामुळे या कंपन्या पुन्हा एकदा त्यांचे रिचार्ज प्लॅन वाढवू शकतात.
दूरसंचार नियामक विभागाने फेक कॉल आणि मेसेजबाबत नवीन धोरण आणण्यास सांगितले आहे. हे नवीन धोरण 1 ऑक्टोबर 2024 पासून लागू होणार असल्याचे म्हटले जात आहे. या अंतर्गत दूरसंचार कंपन्या या नवीन धोरणाचे पालन करणार नाहीत. त्यांच्यावर मोठा दंड ठोठावण्यात आला आहे. त्याचवेळी ट्रायने ज्या टेलिकॉम कंपन्या फेक कॉल आणि मेसेज थांबवण्यात अपयशी ठरल्या आहेत, त्यांच्याकडून मोठा दंड वसूल करण्याचे निर्देश दिले आहेत.
नियामक विभागाने दूरसंचार विभागाकडून दंड वसूल करण्यासाठी दूरसंचार कंपन्यांची बँक गॅरंटी जप्त करण्याची सूचनाही केली आहे. त्यामुळे सर्वसामान्य युजर्सला मोठा आर्थिक फटका बसणार आहे. दूरसंचार विभाग कंपन्यांचे परवाने रद्द करण्याऐवजी मोठा दंड आकारू शकते, असेही सांगण्यात आले.